नदी किनारा नष्ट होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:22 AM2018-05-16T01:22:36+5:302018-05-16T01:22:36+5:30
वैरागड-मानापूर मार्गावरील जुन्या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन जुन्या पुलाच्या बाजूला मोठ्या पुलाचे काम करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही पुलाच्या मधला नदी किनारा खोदण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड-मानापूर मार्गावरील जुन्या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेऊन जुन्या पुलाच्या बाजूला मोठ्या पुलाचे काम करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही पुलाच्या मधला नदी किनारा खोदण्यात आला. या खोदलेल्या भागाची सुरक्षा म्हणून बांधण्यात आलेली संरक्षण भिंत लहान असल्याने पावसाळ्यात पुरामुळे नदी किनारा वाहून जाण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नवीन पुलापासून ते मोठ्या डांबरी रस्ता ते कढोली टी-पार्इंटपर्यंत जो रस्ता बनविण्यात आला आणि रस्त्याच्या बाजू बुजविण्यासाठी जुन्याच पुलाचा दगड वापरण्यात आला. सध्या ठिकाणी पुलाचे काम झाले त्याच्या बाजूला अंदाजे १०० ट्रॅक्टर ट्रॉली रेतीचे अवैध खनन करून येथील रेतीची बाहेर ठिकाणी वाहतूक करण्यात आली. हा सर्व प्रकार संबंधित कंत्राटदाराच्या सांगण्यावरून झाला असावा, असा नागरिकांचा आरोप आहे. जुना कमी उंचीचा पूल व नवीन पुलामधील नदी किनारा खोदण्यात आला. मात्र या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती लहान आहेत. पावसाळ्यात पुरामुळे या नदी किनाºयाचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या संरक्षण भिंती उभारण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सदर प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करण्याची गरज आहे. त्यानंतर सत्य उघडकीस येईल. गावातील अनेक लोकांनी हा प्रकार जवळून पाहिला आहे. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेतली नाही. कारवाई होते काय, याकडे जनतेचे लक्ष आहे.