भविष्यात पाण्याच्या अभावानेही मनुष्याच्या मृत्युची शक्यता नाकारता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:50+5:302021-05-30T04:28:50+5:30

कुरखेडा : पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. ज्याप्रमाणे जिवंत राहण्याकरिता हवेची गरज आहे, त्याचप्रमाणे पाण्याशिवायसुद्धा मनुष्य तसेच प्राणी, जीवजंतू, झाडे ...

The possibility of future human deaths cannot be ruled out | भविष्यात पाण्याच्या अभावानेही मनुष्याच्या मृत्युची शक्यता नाकारता येत नाही

भविष्यात पाण्याच्या अभावानेही मनुष्याच्या मृत्युची शक्यता नाकारता येत नाही

Next

कुरखेडा : पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. ज्याप्रमाणे जिवंत राहण्याकरिता हवेची गरज आहे, त्याचप्रमाणे पाण्याशिवायसुद्धा मनुष्य तसेच प्राणी, जीवजंतू, झाडे यांची कल्पना करता येत नाही. कोरोना या महामारीत प्राणवायू (ऑक्सिजन) अभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. भविष्यात पाण्याच्या अभावानेसुद्धा मनुष्याचा तडफडून मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्याची गरज ओळखत जलसंवर्धन व जलव्यवस्थापन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरचे विभागीय संचालक डॉ.पी.के. जैन यांनी केले.

श्री गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालयात केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या सहकार्याने एक दिवसीय आभासी (ऑनलाईन) कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होत अध्यक्षस्थानावरून डॉ.जैन यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, शहरी भागात रेनवाॅटर हार्वेस्टिंग ही समस्या सिमेंटच्या जंगलामुळे निर्माण होत आहे. भविष्याचा वेध घेत वाहत्या पाण्याला अटकाव करून जमिनीत त्याचा अधिकाधिक निचरा होण्याकरीता उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी उपलब्ध भूजल साठ्याचे संवर्धन व संरक्षण गरजेचे असल्याचे सांगत ग्रामीण नागरिकांना शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात आले तर भविष्याकरिता नवीन भूजल साठ्याचा शोध लागू शकतो, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी नागपूर येथील ज्येष्ठ वैद्यानिक निलोफर व चंद्रपूर येथील भूवैद्यानिक डॉ.विजेता सोलंकी यांनीसुद्धा सहभागी होत या विषयावर आपली मते मांडली.

प्रास्ताविक कार्तिक डोंगरे यांनी तर संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गुणवंत वडपल्लीवार व त्यांच्या चमूने सहकार्य केले. कार्यशाळेचा थेट लाभ परिसरातील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, अभ्यासक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

===Photopath===

290521\img-20210529-wa0067.jpg

===Caption===

फोटो आभासी कार्यशाळेत सहभागी डाॅ जैन, डॉ राजाभाऊ मूनघाटे,प्र कूलगूरू डॉ श्रीराम कावळे

Web Title: The possibility of future human deaths cannot be ruled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.