यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:51 PM2018-04-02T22:51:06+5:302018-04-02T22:51:06+5:30

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे.

The possibility of heat wave this year | यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता

यंदा उष्णतेच्या लाटेची शक्यता

Next
ठळक मुद्देहवामान खात्याचा अंदाज : खबरदारी घेण्याचे जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळयात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळयाची सुरूवातसुध्दा लवकर झालेली आहे. तेव्हा उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये याबाबत आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी कराव्यात असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उन्हापासून स्वत:चा बचाव करावा, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव वेळीच करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कापडे वापरावित. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू- पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी. उन्हापासून संरक्षणाकरिता रस्त्याच्या कडेला शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा प्रशासनाने व सामाजिक संस्थांनी करावी. उन्हाळ्यात उष्माघाताचे दरवर्षी शेकडो बळी जातात. त्यामुळे नागरिकांनी तसेच प्रशासनानेही खबरदारी घ्यावी, असे आपत्ती प्राधिकरणने म्हटले आहे.
बचावासाठी या गोष्टी टाळाव्या
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्या, असे केल्यास स्वत:चा उन्हापासून बचाव करता येईल.

Web Title: The possibility of heat wave this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.