वळण रस्त्यावर वाहने उलटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:57+5:302021-08-29T04:34:57+5:30
सिरोंचा : सिरोंचा ते आसरअली हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ सिरोंचा तालुक्यात मोडतो. या मार्गावर सोमनपल्ली नाल्यावरील ब्रीजचे ...
सिरोंचा : सिरोंचा ते आसरअली हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ सिरोंचा तालुक्यात मोडतो. या मार्गावर सोमनपल्ली नाल्यावरील ब्रीजचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असून निर्माणादिन अवस्थेत आहे. ब्रीजचे काम सुरू असल्याने बाजूने तयार केलेला वळण रस्ता अत्यंत खराब असून चिखलाने भरलेला आहे. येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्ती व ब्रीजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून केली जात आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ तेलंगणा राज्याच्या निजामाबाद ते छत्तीसगड राज्यातील जगदलपूरला जोडणारा दुवा आहे. या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग महाराष्ट्र राज्यातील सिरोंचातून जातो. सिरोंचा ते पातागुडम हा ६० किमीचा मार्ग राष्ट्रीय महामार्गात मोडतो. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आवागमनही सुरू आहे. फक्त अडचण निर्माणदिन अवस्थेत असलेल्या सोमनपल्ली नाल्यावरील ब्रीजचे वळण मार्गाची ! आसरअल्ली ते सोमनपल्ली दरम्यान जंगल परिसरातील या नाल्यावरील ब्रीजचे बांधकाम वर्षभरापासून सुरू आहे. सुरुवातीपासूनच कासवगतीने काम होत असल्याचे म्हटले जाते. वळण मार्ग अत्यंत खराब चिखलाने भरलेला असल्यामुळे वाहने फसू शकतात. वाहन उलटून माेठा अपघात हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. जंगल परिसर असल्याने असुरक्षितता आहे. तहान-भूक भागविणे कठीण होऊन बसते.
बाॅक्स :
१२ काेटींच्या निधीतून हाेताहेत काम
बारा कोटी रुपयांतून ब्रीज हाेत असून सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. ब्रीजवर स्लॅप टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की दोन्ही बाजूला रस्ते जोडल्यावर आवागमनास साेयीचे होईल. कंत्राटदारांच्या दुर्लक्षितपणामुळे मंदगती कामाने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने कंत्राटदाराला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दयावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
280821\img-20210828-wa0010.jpg
सोमनपल्ली नाल्यावरील ब्रीज चे काम पूर्ण करण्याची मागणी