आता गोंडवाना विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी

By दिलीप दहेलकर | Published: May 7, 2023 05:26 PM2023-05-07T17:26:07+5:302023-05-07T17:26:40+5:30

सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि मानव विज्ञान विद्या शाखा आदी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.  

Post Doctoral Fellowship opportunity at Gondwana University now | आता गोंडवाना विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी

आता गोंडवाना विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी

googlenewsNext

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांसाठी फेलोशिपची संधी आहे. पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास 'पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप'ची संधी गोंडवाना विद्यापीठात उपलब्ध होत आहे. त्यामुळे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या सुविधेमुळे विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन आणि मानव विज्ञान विद्या शाखा आदी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनासाठी संधी विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.  

अशी मिळवता येईल फेलोशिप

फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली असून, पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १० मेपर्यत अर्ज करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे अशी माहिती नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार यांनी दिली आहे.

फेलोशिपची वैशिष्ट्ये

पोस्ट-डॉक्टरेट संशोधन हे शैक्षणिक/संशोधन सुरू करण्यासाठी तसेच तरुण संशोधकांना तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे सक्षम पाऊल आहे.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पीएच. डी. धारकांना विद्यापीठ पोस्ट डॉक्टरल फेलोशिपचा लाभ घेता येईल.
पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपमध्ये २४ हजार रुपये दरमहा फेलोशिप असेल. दरवर्षी देण्यात येणाऱ्या पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची एकूण संख्या चार असेल
पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप विद्यापीठाच्या चार विद्याशाखांमधून जसे, की विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव विज्ञान विद्या शाखा आणि आंतरविद्याशाखा राहील.

Web Title: Post Doctoral Fellowship opportunity at Gondwana University now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.