हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:27 PM2018-11-10T22:27:56+5:302018-11-10T22:28:16+5:30

भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Pothic Empire on the Harnaghat Road | हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

हरणघाट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

Next
ठळक मुद्देअपघात वाढले : वाहनधारक कमालीचे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भेडाळा-हरणघाट मार्ग पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, सावली तालुक्यातील गावांना जोडतो. चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी मुलला जातात. तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा या परिसरातील हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी व प्रवाशी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. वर्दळीच्या तुलनेत सदर मार्ग अरूंद आहे. त्यातही या मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दोटकुली हे गाव वैनगंगा नदी जवळ आहे. वैनगंगा नदी व दोटकुली गाव यांच्या मध्ये नाला असून या ठिकाणचा पूल उंच नसल्याने खोलगट भाग निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मार्ग उखडला आहे. मार्गाच्या बाजूलाच मोठा खड्डा पडला आहे.
वाहनाला ओव्हरटेक करतांना किंवा दुसऱ्या वाहनाला मार्ग देताना वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन वाहन या खड्ड्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर खड्डा बुजविणे आवश्यक आहे. रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने केवळ खड्डे न बुजविता मार्गाचे नूतनीकरणच करणे आवश्यक आहे. हरणघाट-चामोर्शी दरम्यान फोकुर्डी जवळही मोठा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Pothic Empire on the Harnaghat Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.