कोलपल्ली-कोठारी मार्गावरचे खड्डे श्रमदानातून बुजविले

By admin | Published: October 21, 2016 01:26 AM2016-10-21T01:26:54+5:302016-10-21T01:26:54+5:30

तालुक्यातील तुमरगुंडा ते कोठारी रस्त्यावर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते.

The potholes on the Kolpoli-Kothari road were flooded with labor | कोलपल्ली-कोठारी मार्गावरचे खड्डे श्रमदानातून बुजविले

कोलपल्ली-कोठारी मार्गावरचे खड्डे श्रमदानातून बुजविले

Next

मुलचेरा : तालुक्यातील तुमरगुंडा ते कोठारी रस्त्यावर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोलपल्ली ते कोठारी रस्त्यादरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनेही खड्ड्यांमुळे चालविणे कठीण झाले होते. कोठारी येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावरील खड्डे दगड, रेती, मुरूम, बैलबंडीने गोळा करून बुजविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोठारीवासीयांचा आदर्श घेत कोलपल्ली वासीयांनी उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविले.
श्रमदानासाठी कोठारी येथील शंकर उरेते, केशव कडते, बालाजी कडते, विश्वनाथ उरेते, सुरेश सिडाम, बंडू कडते, जितेंद्र कडते, संभाजी नैताम, गुलाब कडते, सत्यवान कडते, संन्याशी कडते, रामा कडते, कोलपल्ली येथील सुरेश कुसनाके, भास्कर आत्राम, मधुकर पेंदाम, कालिदास चौधरी, झुंगा आत्राम, मोतीराम कुसनाके, संभाजी कुसनाके, रामदास पेंदाम, महादेव चौैधरी तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The potholes on the Kolpoli-Kothari road were flooded with labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.