पेट्राेल टाकताय, मशिनवरील आकडे शून्य केले का ते बघा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 AM2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:44+5:30
प्रत्येक ग्राहकाला पेट्राेलच्या किमतीचे आकडे लाॅक केल्यानंतरच पेट्राेल टाकावे, असे सक्त निर्देश पेट्राेल कंपन्यांनी दिले आहेत. मात्र लाॅकची सिस्टीम वापरली तर डिलिव्हरी बाॅयला हातचलाखी करणे शक्य हाेत नाही. काही डिलिव्हरी बाॅय एखाद्या ग्राहकाला पेट्राेल टाकल्यानंतर दुसऱ्या ग्राहकाला पेट्राेल टाकतेवेळी मशिनवरील आकडा शून्य करतात. मात्र पहिल्या ग्राहकाने कमी किमतीचे पेट्राेल टाकले व दुसरा ग्राहक जास्त किमतीचे पेट्राेल टाकत असेल तर पेट्राेलचे आकडे शून्यावर न आणता सरळ पेट्राेल टाकले जाते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ग्राहक जेवढ्या किमतीचे पेट्राेल मागेल, तेवढ्या किमतीचे आकडे पेट्राेल टाकणाऱ्या मशीनवर टाकून नंतरच पेट्राेल देणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली शहरातील बऱ्याचशा पेट्राेलपंपांवर मशिनवर आकडे लाॅक केले जात नाहीत. यात काही डिलिव्हरी बाॅय ग्राहकांना कमी पेट्राेल देऊन फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक ग्राहकाला पेट्राेलच्या किमतीचे आकडे लाॅक केल्यानंतरच पेट्राेल टाकावे, असे सक्त निर्देश पेट्राेल कंपन्यांनी दिले आहेत. मात्र लाॅकची सिस्टीम वापरली तर डिलिव्हरी बाॅयला हातचलाखी करणे शक्य हाेत नाही. काही डिलिव्हरी बाॅय एखाद्या ग्राहकाला पेट्राेल टाकल्यानंतर दुसऱ्या ग्राहकाला पेट्राेल टाकतेवेळी मशिनवरील आकडा शून्य करतात. मात्र पहिल्या ग्राहकाने कमी किमतीचे पेट्राेल टाकले व दुसरा ग्राहक जास्त किमतीचे पेट्राेल टाकत असेल तर पेट्राेलचे आकडे शून्यावर न आणता सरळ पेट्राेल टाकले जाते. त्यामुळे जुन्या ग्राहकाचे पेट्राेल हिशाेबात घेतले जाते. नवीन ग्राहकाला प्रत्यक्षात कमी पेट्राेल मिळते.
एकीकडे पेट्राेलचे दर वाढले असताना नागरिक हैराण आहेत, तर दुसरीकडे डिलिव्हरी बाॅय त्यातही ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.
बाेलत ठेवून केली जाते फसवणूक
- पेट्राेल टाकणाऱ्या व्यक्ती जर ५०० रूपयांचे पेट्राेल टाकताे, असे म्हणत असेल तर त्याला ५२०, ५३० चे पेट्राेल टाकू का? असे सांगितले जाते. यावेळी ग्राहकाचे लक्ष विकेंद्रीत हाेते. त्यावेळीच डिलिवरी बाॅय पेट्राेल टाकण्यास सुरूवात करते. एकदा आकडे बदलण्यास सुरूवात झाल्यानंतर ग्राहकही दावा करू शकत नाही. याचा गैरफायदा डिलिवरी बाॅय घेतात.
लाॅक करूनच पेट्राेल घ्या
- मशीनवरील आकडे लाॅक करूनच पेट्राेल देणे सक्तीचे आहे. मात्र याबाबत बऱ्याच ग्राहकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे पेट्राेलपंप चालक व कामगारांचे खिसे भरत आहेत.
- कार चालक वाहनाबाहेर न निघताच पेट्राेल भरतात. यावेळी डिलिवरी बाॅय त्यांची माेठ्या प्रमाणात फसवणूक करतात.
- पेट्राेल टाकणारी मशीन लाॅक करण्याचे निर्देश डिलिवरी बाॅयला द्यावे.
गडचिराेली शहरातील एसबीआय बॅंकेच्या जवळ असलेल्या पेट्राेल पंपावर माझी दाेनदा फसवणूक करण्याचा प्रयत्न तेथील डिलिवरी बाॅयने केला आहे. माझ्यापूर्वी एका ग्राहकाने ७० रूपयांचे पेट्राेल टाकले हाेते. मला ५०० रूपयांचे पेट्राेल पाहिजे हाेते. त्यावेळी डिलिवरी बाॅयने मशीनवरील आकडे शून्य न करताच वाहनाच्या टॅंकमध्ये बॅरेल टाकला. मात्र माझे लक्ष मशीनकडे असल्याने फसवणूक टळली. याबाबत व्यवस्थापकाकडे तक्रार केली. मात्र काहीच फायदा झाला नाही. या पेट्राेल पंपावर पेट्राेल टाकतेवेळी नागरिकांनी सावधानता बाळगावी.
- विकास गेडाम, गडचिराेली