फांद्यांची कटाई न केल्याने विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:22+5:302021-09-18T04:39:22+5:30
विजेच्या तारांवरील झाडाच्या फांद्यांची कटाई न केल्याने वारंवार होतो ब्रेकडाऊन... विज समस्या निकाली काढण्याची प्रवीण राहाटे यांची मागणी...... आरमोरी ...
विजेच्या तारांवरील झाडाच्या फांद्यांची कटाई न केल्याने वारंवार होतो ब्रेकडाऊन...
विज समस्या निकाली काढण्याची प्रवीण राहाटे यांची मागणी......
आरमोरी : तालुक्यातील कासवी परिसरात गेल्या महिनाभरापासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. दिवसा लपंडाव व रात्री बत्ती गुल होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. विजेच्या तारांनजीकच्या झाडाच्या फांद्याची कटाई न केल्याने वारंवार ब्रेकडाऊन होत आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे विजेच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विजेची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण राहाटे यांनी केली आहे.
शेतीपंप तसेच इतर कामासाठी विजेची आवश्यकता असताना महावितरणचे अधिकारी म्हणतात, ब्रेकडाऊन आहे. विजेच्या अयोग्य विद्युत प्रवाहामुळे पंखे टिव्ही व इतर घरगुती उपकरणे तसेच शेतातील मोटारपंप कमी-जास्त दाबामुळे निकामी होतात. २४ तासांतून १० ते १५ तास अनियमित वीजपुरवठा होतो. त्यातच कमी पाऊस पडल्याने उकाडा वाढला आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने विजेअभावी अंधारात काढावी लागते. दिवसा तर लपंडाव होतोच, मात्र रात्री बत्ती गुल झाली की कधी सकाळी तर कधी दुपारी वीज येते. गेल्या महिनाभरापासून असा प्रकार सुरू आहे.
जोगीसाखरा फिडरवरून जेव्हापासून वीजपुरवठा हाेत आहे तेव्हापासूनच इन्शुलन्स बदलविण्यात आले नाही. तसेच एबी स्वीच हे प्रत्येक गावाजवळ देण्यात न आल्याने नागरिकांना यातना भोगावे लागत आहे. तत्काळ विजेची समस्या तत्काळ निकाली काढण्याची मागणीही राहाटे यांनी केली.
170921\img-20210917-wa0042.jpg
प्रवीण राहाटे यांचा फोटो