वीज खांब राज्य महामार्गावरच उभे

By admin | Published: May 16, 2016 01:33 AM2016-05-16T01:33:25+5:302016-05-16T01:33:25+5:30

देसाईगंज शहराच्या तीन बाजुंनी महामार्ग जातात. या मार्गाचे रूंदीकरण पाच ते सात वर्षांपूर्वी करण्यात आले आहे.

Power pillars stand on the state highway | वीज खांब राज्य महामार्गावरच उभे

वीज खांब राज्य महामार्गावरच उभे

Next

देसाईगंजमधील प्रकार : राज्य महामार्गाच्या रूंदीकरणानंतही स्थिती कायम
देसाईगंज : देसाईगंज शहराच्या तीन बाजुंनी महामार्ग जातात. या मार्गाचे रूंदीकरण पाच ते सात वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. रस्ता रूंद झाला असला तरी विजेचे खांब मात्र जुन्याच जागी असल्याने वाहतुकीस कायम अडथळा निर्माण होत आहे. महावितरणाने रस्त्यातील येणारे वीज खांब बाजुला सारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील पाच वर्षांत देसाईगंज ते लाखांदूर, कुरखेडा, ब्रह्मपुरी या राज्य महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले. या रूंदीकरणात प्रस्तावित मार्ग १२५ फुटाचा झालेला आहे. सुरुवातीला रस्ता अरूंद असल्याने विजेचे खांब रस्त्यालगत असले तरी आता रूंदीकरणामुळे ते विजेचे खांब रस्त्याच्या ३० फूट आतमध्ये आले असून हा मार्ग रहदारीस वापरणे अशक्य झाले आहे. नगर पालिकेने पथदिव्याची लाईन बाजुला नेली असून महावितरणाचे खांब मात्र मागील पाच वर्षांपासून रस्ता रूंदीकरणानंतरही जुन्याच जागेवर आहेत. ते हटवून मार्ग रहदारीसाठी व्यवस्थित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देसाईगंज शहरातच अशी परिस्थिती नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये रस्ता रूंद केल्यानंतरही विजेचे खांब, त्याचे तणावे आदी रस्त्यावर अजूनही उभे आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलबंडी, ट्रॅक्टर वळविण्यास शेतकऱ्यांना अडचण जाते.

Web Title: Power pillars stand on the state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.