सहा महिन्यांपासून वीज समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:15+5:30

धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या वाढल्यानंतर नागरिकांनी कुठे बिघाड आहे याबाबत लाईनमनद्वारा विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

Power problems for six months | सहा महिन्यांपासून वीज समस्या

सहा महिन्यांपासून वीज समस्या

googlenewsNext
ठळक मुद्देरांगी परिसर : वर्षभरापूर्वी बिघाडाबाबत माहिती देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्याच्या रांगी परिसरात वर्षभरापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असताना बिघाडाबाबतची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मागील सहा महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या वाढल्यानंतर नागरिकांनी कुठे बिघाड आहे याबाबत लाईनमनद्वारा विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. सहा महिन्यांपासून दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दिवसात तसेच रात्रीच्या सुमारास उकाड्याचा त्रासही नागरिकांना होतो.
संपूर्ण धानोरा तालुक्यातच वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या आहे. आधीच जंगलव्याप्त तसेच नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वेळीच बिघाडीची दुरूस्ती होत नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागते.
तालुक्यात अनियमित वीज पुरवठा होत असतानाही ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहे. लॉकडाऊनमुळे आधीच सर्व कामधंदे, व्यवसाय ठप्प असतानाही स्थिर आकार, वीज आकार व इतर आकार मिळून अवाढव्य बिल पाठविले जात असल्याने नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी अनिल गणवनेवार, देवराव कुनघाडकर, प्रवीण मडावी, अहमद अली सय्यद, अरविंद जाधव, आमीर पठाण, अजमेर पठाण, मो. आलम यांच्यासह रांगी व परिसराच्या गावातील विद्युत ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

ऑनलाईन व बँक व्यवहारांवर परिणाम
रांगी परिसरात मागील सहा महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालये, बँका तसेच अन्य ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. ऑनलाईन कामे करताना वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कामावर परिणाम होतो. तसेच बँकेतील अनेक व्यवहार बाधित होतात. अनेकदा लिंक फेल तर कधी टॉवर बंद होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे बँकेत बाहेर गावाहून आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते. शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा व अन्य दाखले काढताना अडचणी येतात. ही सर्व समस्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे उद्भवत असतानाही धानोरा येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप होत आहे.

Web Title: Power problems for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज