विविध समस्यांवर गाजली पं.स. आमसभा

By admin | Published: April 16, 2017 12:35 AM2017-04-16T00:35:27+5:302017-04-16T00:35:27+5:30

जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा अभाव, जनतेच्या कामात प्रशासकीय दिरंगाई, डिजिटल शाळेचे विद्युत बिल आदीसह विविध समस्यांवर धानोरा पंचायत समितीची आमसभा गाजली.

Powered by Blogger. General meeting | विविध समस्यांवर गाजली पं.स. आमसभा

विविध समस्यांवर गाजली पं.स. आमसभा

Next

बीडीओंवर कारवाईची मागणी : खंडित वीजपुरवठा, पाणीटंचाई, रस्ते आदी मुद्यांवर चर्चा
धानोरा : जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा अभाव, जनतेच्या कामात प्रशासकीय दिरंगाई, डिजिटल शाळेचे विद्युत बिल आदीसह विविध समस्यांवर धानोरा पंचायत समितीची आमसभा गाजली.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी धानोरा येथील पंचायत समिती परिसरात आमसभा पार पडली. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य राजू जीवानी, श्रीनिवास दुलमवार, लता पुंघाटे, शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, गोपाल उईके, संजय कुंडू, ताराबाई कोटांगले, तहसीलदार गणवीर, संवर्ग विकास अधिकारी सपाटे, पं.स. सदस्य मैनाबाई कोवाची, महागू वाटगुरे, विलास गावंडे आदी उपस्थित होते.
धानोराच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही. जयंती कार्यक्रमासाठी पं.स. सभापती पाचारण केले नाही, अशी तक्रार सभापती अजमन राऊत यांनी आमसभेत केली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच गणवेशची व्यवस्था करण्यात येईल, असे जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी सांगितले. कक्ष अधीक्षक टेंभुर्णे यांनी आमदार क्रिष्णा गजबे यांनी मागितलेली माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात येईल, असे आमदार डॉ. होळी यांनी सभेत सांगितले. जनतेची कामे करण्यास हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परवा केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
हातपंप दुरूस्तीसाठी नवीन वाहन देण्यात यावे, ग्रामीण रूग्णालयात सोनोग्राफीची व्यवस्था करण्यात यावी, रूग्णवाहिका देण्यात यावी, डिजिटल शाळेला विद्युत बिल भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेंढरी येथील ३३ केव्ही पॉवर हाऊसचे काम तीन महिन्यात पूर्ण कर, असे निर्देश आमदार महोदयांनी दिले. सालेभट्टी येथे सात विहिरींचे खोदकाम करण्यात आले. मात्र पाणी लागले नाही. मुंगनेर गावात सात दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत आहे. धानोरा तालुक्यात विविध समस्या असल्याने संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सुगंधा उईके यांनी आमसभेत केली. शाळेतील विद्यार्थ्यांना गोंडी भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सुनिल कुमरे यांनी केली. लेखा येथील पाणी पुरवठा योजना तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या आहे. जांगदा, गोडलवाहीसह ग्रामीण भागातील रस्ते तयार करावेत, अशी मागणी आमसभेत करण्यात आली. सभेचे संचालन विस्तार अधिकारी सावसाकडे तर आभार सहायक बीडीओ निलेश वानखेडे यांनी केले.

Web Title: Powered by Blogger. General meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.