प्राणहिता पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:40 AM2018-02-08T00:40:52+5:302018-02-08T00:42:10+5:30

सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ प्राणहिता नदीवर मागील वर्षीपासून पूल बांधला जात आहे. पावसाळ्यात काम ठप्प पडले होते. पूल बांधकामाच्या कामाला मागील आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे.

Pranhita bridge work | प्राणहिता पुलाचे काम सुरू

प्राणहिता पुलाचे काम सुरू

Next
ठळक मुद्देनदीपात्रात तयार केला कच्चा रस्ता : सिरोंचातील नागरिकांसाठी सोयीचे

ऑनलाईन लोकमत
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ प्राणहिता नदीवर मागील वर्षीपासून पूल बांधला जात आहे. पावसाळ्यात काम ठप्प पडले होते. पूल बांधकामाच्या कामाला मागील आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे.
प्राणहिता नदीमध्ये अर्धवट स्थितीत पिलर उभारले आहेत. ज्या ठिकाणी पिलर उभे आहेत, त्या ठिकाणी पाणी असल्याने कामाला सुरुवात करण्यापूर्वी कच्चा रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाळा संपल्यानंतरही बरेच दिवस बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे पूल अर्धवटच राहणार की काय, अशीही शंका व्यक्त केली जात होती. स्थानिक नागरिकांकडून पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूल पूर्ण होईल, अशी आशा बाळगली जात आहे. या पुलामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भाग जोडला जाणार आहे. आदिलाबाद, मंचेरियल, चेन्नूर या भागातील बसेस या पुलामुळे सुरू होण्यास मदत होईल.
सिरोंचा तालुक्यातील प्रशासकीय कामे महाराष्ट्रात होत असली तरी येथील नागरिकांची संस्कृती तेलंगणासोबत मिळतीजुळती आहे. बहुतांश रोटी-बेटी व्यवहार तेलंगणातील नागरिकांसोबतच केले जातात. मात्र यापूर्वी पूल नसल्याने ये-जा करताना फार मोठी अडचण निर्माण होत होती. कालेश्वरनंतर आता धर्मपुरी गावाजवळ आणखी एक पूल बनत असल्याने नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे. या पुलाचे काम लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Pranhita bridge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.