सायकल दाैड स्पर्धेत प्रवीण व साहिल अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:59+5:302021-01-25T04:36:59+5:30

सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ग्रॅंडमास्टर एंजल देवकुले हिच्या ...

Praveen and Sahil topped the cycle race | सायकल दाैड स्पर्धेत प्रवीण व साहिल अव्वल

सायकल दाैड स्पर्धेत प्रवीण व साहिल अव्वल

Next

सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ग्रॅंडमास्टर एंजल देवकुले हिच्या हस्ते सायकल दाैड स्पर्धेला भगवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. खुल्या गटासाठी शिवसेना कार्यालय चामाेर्शी राेड ते शिवणी व परत शिवसेना कार्यालय असे १६ किमी अंतर ठेवण्यात आले. शालेय गटासाठी शिवसेना जिल्हा कार्यालय ते वाकडी असे ६ किमी अंतर ठेवण्यात आले. या गटात इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थी स्पर्धकांचा समावेश हाेता. खुल्या गटात प्रथम आलेल्या प्रवीण वासेकरने ५ हजार रुपये राेख व स्मतिचिन्ह असे पारिताेषिक पटकाविले. तर चंद्रपूर येथील शंकर फाले याने ३ हजार ५०० रुपयांचे द्वितीय बक्षीस तर उपरी येथील विशाल भांडेकर याने तृतीय २ हजार ५०० रुपयांचे राेख पारिताेषिक पटकाविले. शालेय गटात प्रथम क्रमांक साहिल गेडाम याने ५ हजार रुपये राेख, उदय चटवा याने द्वितीय क्रमांकाचे ३ हजार ५०० रुपयांचे पारिताेषिक तर हिमांशू धनगून याने २ हजार ५०० रुपयांचे तृतीय पारिताेषिक पटकाविले. काही स्पर्धकांना प्राेत्साहन पारिताेषिक देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा संघटक विलास काेडापे, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, जिल्हा समन्वयक सुनील पाेरेड्डीवार, उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, शहरप्रमुख रामकिरीत यादव, तालुकाप्रमुख गजानन नैताम, उपतालुकाप्रमुख यादव लाेहंबरे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, संजय बाेबाटे, माणिकराव ठाकरे, गणेश दहेलकर, घनश्याम काेलते, राजू ठाकरे, संदीप आलबनकार, ईश्वर लाजुरकार, बालाजी फुकटे, विनायक चनेकार, राहूल चनेकार, सूरज उईके, साैरव मडावी, भुपेंद्र गेडाम, अमाेल मेश्राम, भरत कांबळे, सुभाष ठाकरे, तानाेबा दाजगाये, स्वप्निल खांडरे, निकेश लाेहंबरे, लाेभाजी झाडे, गाेपाल पानसे, दिवाकर आत्राम, हिवराज मेश्राम, एकनाथ काेलीवार, अजय ठाकरे, अनिल मडावी, राजेंद्र उंदीरवाडे, सदाशिव वरखडे, सचिन मेश्राम, माधव चाैधरी, नेपाल लाेहंबरे, माेहन कळमकर आदी शिवसैनिक उपस्थित हाेते.

Web Title: Praveen and Sahil topped the cycle race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.