शोध व बचाव पथकामार्फत मान्सूनपूर्व रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:00+5:302021-06-19T04:25:00+5:30
सन २०२० च्या महापुरात फटका बसलेल्या गावांपैकी काही गावांची रंगीत तालीमकरिता निवड करण्यात आली होती हे विशेष. सदर प्रशिक्षणास ...
सन २०२० च्या महापुरात फटका बसलेल्या गावांपैकी काही गावांची रंगीत तालीमकरिता निवड करण्यात आली होती हे विशेष. सदर प्रशिक्षणास एसडीआरएफ नागपूरचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कराळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, देसाईगंजचे तहसीलदार संतोष महाले, कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, एसआरपीएफचे पोलीस कल्याण अधिकारी पवन मिश्रा, आरमोरीचे पो.निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी, बीडीओ चेतन हिवंज, देसाईगंज न.प.चे मुख्याधिकारी भूषण रामटेके, आरमोरीच्या माधुरी सलामे डॉ.अभिजित मारबते, नायब तहसीलदार योगेंद्र चापले, राम नैताम, एसडीआरएफचे उपनिरीक्षक अजय कालसर्पे आदींसह महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
(बॉक्स)
या बाबींचे केले प्रात्याक्षिक
सदर प्रात्यक्षिकांमध्ये ५ मिनिटांच्या आत रबर बोट असेम्बल करणे, दोरीच्या सहाय्याने वाचविणे, नदीमध्ये योग्यरित्या बोट चालविणे, बोट बंद पडल्यास योग्यरित्या बाहेर येणे, बोट पलटल्यास बोट पुन्हा सरळ करणे, थर्माकॉल/ पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल इत्यादीद्वारे लाईफ जॅकेटसारखे एखाद्याचा जीव वाचविण्याचे कौशल्य याबाबत एसडीआरएफ नागपूर यांच्या चमूने मार्गदर्शन केले.