मान्सूनपूर्व नियोजन आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:03+5:302021-06-18T04:26:03+5:30

या आढावा बैठकीला पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) डॉ. सागर डुकरे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पाटबंधारे विभागाचे शाखाधिकरी विकास ...

Pre-monsoon planning review meeting | मान्सूनपूर्व नियोजन आढावा बैठक

मान्सूनपूर्व नियोजन आढावा बैठक

Next

या आढावा बैठकीला पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) डॉ. सागर डुकरे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, पाटबंधारे विभागाचे शाखाधिकरी विकास आर. दुधबावरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी. जे डोंगरे, न. प. चे. मोरेश्वर पेंदाम, दूरसंचारचे अविनाश कुमारसिंह, मार्कडा क. चे वनपरिक्षेत्राधिकारी पी. एल. कांबळे, सार्वजनिक बांधकामचे सहायक अभियंता धीरज बडे, ए. जी. कन्स्ट्रक्शनचे किशोर गायकवाड, भेंडाळा मंडळ अधिकारी तारेश फुलझले, कुनघाडा मंडळ अधिकारी पी. टी. बाळापूरे, येणापुर मंडळ अधिकारी एस. व्ही. श्रीरामे, आष्टी मंडळ अधिकारी एस. व्ही. सरपे, घोट मंडळ अधिकारी एस. डी. शिंपी आदी उपस्थित होते.

बाॅक्स

या बाबींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश

सभेत मान्सून काळात तालुक्यात विविध भागात पूरपरिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती काळात पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचतील त्यासाठी पथकाकडे आवश्यक संसाधने हाताळणेसंबंधी प्रशिक्षण देणे. पावसामुळे धरणाचे पाणी सोडल्याने नद्यांची, पुलांची व तलावाच्या पाण्याची पातळी अचानकपणे वाढण्याची शक्यता असते. नदीकाठावरील गावांना वेळीच सावध करणे, प्रथमोपचार पथक प्रत्येक गावपातळीवर तयार करणे. विद्युत पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील राहणे. सखल भागात विद्युत खांब पाण्याखाली येण्याची शक्यता असते. तेव्हा जिवंत तारांमुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी सतर्क रहावे. धोकादायक तलाव, पूल, इमारती रस्ते आदी कामांची डागडुजी करणे, धोकादायक, अर्धवट, कच्च्या पुलावरून, नाल्यावरून वाहतूक बंदी तत्काळ करण्यात यावी. तेथे पुलाच्या दोन्ही बाजूने सूचना फलक लावण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर मलबा काढणे, डस्टिंग करणे, कचरा सफाई, पिण्याच्या पाण्याचे स्रोत निर्जंतुकीकरण करणे, दूरसंचार व्यवस्था अखंडित राहील यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात यावे, वाऱ्याने झाडे पडल्यास ते बाजूला काढून रस्ता वाहतुकीस खुला करणे. तहसीलकडून प्राप्त माहिती कोतवलाच्या साहाय्याने प्रत्येक गावात दवंडीद्वारे नागरिकांना देणे, असे निर्देश तहसीलदार यांनी दिले.

===Photopath===

170621\img-20210617-wa0154.jpg

===Caption===

आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक फोटो

Web Title: Pre-monsoon planning review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.