रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेणखताला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:11+5:302021-05-17T04:35:11+5:30
जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, गांडूळ खत, जैविक खते वापरली जातात. पाळीव जनावरांच्या शेणापासूनच तयार झालेले खत जमिनीच्या सुपिकतेसाठी ...
जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, गांडूळ खत, जैविक खते वापरली जातात. पाळीव जनावरांच्या शेणापासूनच तयार झालेले खत जमिनीच्या सुपिकतेसाठी फायदेशीर आहे. जून व जुलै महिन्यांपासून शेणखत चारा एका विशिष्ट खड्ड्यात जमा केला जातो. पावसाळ्यात शेणखत व चारा पूर्णत: कुजून उत्कृष्ट दर्जाचे खत तयार होते. हे खत एप्रिल व मे महिन्यात शेतकरी शेतात टाकून पसरवितात. रासायनिक खताचा वारेमाप वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्याच्या लक्षात आले. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्याला पारंपरिक शेणखताची आठवण झाली. सध्या ग्रामीण भागात बैलबंडी, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेणखत टाकले जात आहे. ट्रॅक्टरची प्रती ट्रॉली ७०० ते ८०० रुपये भाडे आकारले जाते. चामोर्शी तालुक्यात सध्या शेणखत टाकण्याच्या कामाला जोमात सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने जमिनीची सुपिकता वाढविण्यास शेतकऱ्यांनी शेणखताला अधिक पसंती दिली.
बाॅक्स
शेतातील धुऱ्यांची स्वच्छता सुरू
काही दिवसातच खरीपपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. सध्या शेतकरी शेतातील कचरा जाळण्याचे काम करीत आहेत. रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता शेतकरी शेतातील कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत. विशेष म्हणजे, पुरुषांसोबतच महिलाही सकाळच्या सुमारास शेत शिवारात जाऊन कचरा जाळणे, जळमट गोळा करणे, शेतातील काटेरी झाडे ताेडणे आदी कामे करीत आहेत.
===Photopath===
160521\img-20210516-wa0159.jpg
===Caption===
बैलबंडीत शेणखत भरताना शेतकरी.