शहराबाहेरील रेडीमेड घरांना पसंती; घर बांधणे अनेकांना आता वाटतं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:35 PM2024-11-05T15:35:00+5:302024-11-05T15:38:46+5:30
गुंतवणुकीवर भर : कर्ज काढून होत आहे प्लॉटची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रिकामे प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधणे अनेकांना आता कठीण होत आहे. त्यामुळे इतर मोठ्या शहरांप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातही फ्लॅटची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात वास्तव्यास असलेले अनेक नागरिक ग्रामीण भागात आले आहेत. ग्रामीण भागात प्रशस्त जागा राहते. त्यामुळे शहरात प्लॉट खरेदी करतानाही लाख रुपये अधिक गेले तरी मोठा प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधण्याची मानसिकता आहे. मात्र, ८ ते १० लाखांचा प्लॉट खरेदी करून त्यावर २० लाखांचे घर बांधणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे आता गडचिरोली शहरातही लहान आकारातील अपार्टमेंटची संकल्पना पुढे येत आहे. एखाद्या बिल्डरने अपार्टमेंट बांधल्यानंतर नागरिक रेडीमेड घर खरेदी करीत आहेत.
जुन्या घरांनाही ग्राहक मिळेना
शहरात ८० पेक्षा अधिक जुने घर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे घर जुन्या पद्धतीचे असल्याने या घरांना ग्राहक मिळत नसल्याची माहिती आहे. अनेक घरांपुढे गेल्या तीन-चार वर्षांपासून पाट्या लागून आहेत.
फ्लॅटचे कोणत्या भागात काय दर !
- गडचिरोली मुख्य शहर : गडचिरोली शहरातील मुख्य वस्त्यांमध्ये काही ठिकाणी फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. १५ ते २० लाख रूपये होतात . १५ ते २० लाख रुपये किमतीने फ्लॅट उपलब्ध आहेत.
- नवेगाव मार्ग : फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. या परिसरात थोडे स्वस्त दरात फ्लॅट उपलब्ध बांधकाम केले जात आहे. प्लॉटच्या तुलनेत फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने अनेक नागरिक फ्लॅट खरेदी करत आहेत.
- आरमोरी मार्ग : आरमोरी मार्गावरही काही ठिकाणी फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. नवीन वस्त्यांमध्ये या फ्लॅटचे बांधकाम होत आहे. अयोध्यानगरातही फ्लॅटचे बांधकाम पुर्ण झाले आहे.