आंबेडकरी साहित्य संमेलनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:13+5:302021-02-07T04:34:13+5:30
गडचिराेली : स्थानिक धानाेरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर २७ व २८ फेब्रुवारी राेजी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात ...
गडचिराेली : स्थानिक धानाेरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर २७ व २८ फेब्रुवारी राेजी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात आले असून या संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. संमेलनात पाहुण्यांची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती आयाेजक मुनिश्वर बाेरकर व जि.प.सदस्य राम मेश्राम यांनी दिली आहे.
महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. अशाेक पळवेकर राहणार आहेत. उद्घाटन बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हाेणार असून प्रमुख मार्गदर्शक आ. प्रा. जाेगेंद्र कवाडे राहणार आहेत.
स्वागताध्यक्ष म्हणून ॲड. राम मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील भन्ते राजरत्न, सिनेकलाकार डाॅ. सूरज कुथे, उपायुक्त संघमित्रा खाेब्रागडे, माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनाेहर पाेरेटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुनिश्वर बाेरकर यांनी केले आहे.