आरोग्यपत्रिका तयार

By admin | Published: May 30, 2014 12:02 AM2014-05-30T00:02:09+5:302014-05-30T00:02:09+5:30

कृषी विभाग व मृद संधारण विभागाच्यावतीने जिल्ह्यात दरवर्षी पीक लागवडीसाठी वापर होत असलेल्या जमिनीची चाचणी करण्यात येते. गतवर्षीही जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व चाचणी करण्यात आली.

Prepare the arsenic | आरोग्यपत्रिका तयार

आरोग्यपत्रिका तयार

Next

मृद सर्वेक्षण व चाचणी : १४ हजार ७१२ आरोग्यपत्रिका
गडचिरोली : कृषी विभाग व मृद संधारण विभागाच्यावतीने जिल्ह्यात दरवर्षी पीक लागवडीसाठी वापर होत असलेल्या जमिनीची चाचणी करण्यात येते. गतवर्षीही जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व चाचणी करण्यात आली. चाचणीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानतर एकूण १४ हजार ७१२ आरोग्य पत्रिका तयार करून वितरित करण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्र १४ लाख ४८ हजार २७२ हेक्टर आहे. जमिनीचा उतार ३ टक्के आहे. सन २0१३-१४ या वर्षात कृषी विभागाकडे १0 हजार ४२४ मृद नमुने प्राप्त झाले. तसेच मार्च २0१४ अखेर २ हजार ६६४ नमुने शिल्लक होते. दोन्ही मिळून एकूण १३ हजार ५८ मृद नमुने तपासणीस उपलब्ध झाले आहे. त्यापैकी या वर्षामध्ये ८ हजार ८२५ सर्वसाधारण मृद नमुन्याची चाचणी करण्यात आली. यावरून गडचिरोली जिल्ह्याचा सुपिकता निर्देशांक व सुपिकतेची पातळी तयार करण्यात आली. जिल्ह्याचा नत्र, स्फुरद, पालाश या गुणधर्माचा सुपीकतेचा निर्देशांक अनुक्रमे १.२४, १.३२ व २.४४ आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार नत्राची सुपिकता पातळी कमी असून खताची मात्रा २५ टक्के वाढवून देण्यात आली. स्फुरद गुणधर्माची मात्रा मध्यम असून पालाश गुणधर्माची मात्रा भरपूर प्रमाणात आहे. तसेच पालाश खताची मात्रा २५ टक्क्याने कमी करून देण्याबाबत कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात ८३ टक्के आम्लधर्मी, १६ टक्के सर्वसाधारण, १ टक्के विम्लधर्मी प्रकारची जमीन आहे. पाण्याची प्रतवारी पिकासाठी खराब २ टक्के, उच्चप्रतीचे ५४ टक्के व मध्यम ४४ टक्के आहे. जिल्ह्यात मृदमाला ९ असून जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी आहे. कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद चाचणी करण्यात येते. गतवर्षी २0१३-१४ मध्ये एकूण सर्वसाधारण  नुमने ६ हजार २९९ व सुक्ष्म नमुने ६ हजार ९९ प्राप्त झाले. यापैकी सर्वसाधारण ५ हजार ३ व सुक्ष्म ५ हजार ३ नमुन्याचे पृथ:करण करण्यात आले. यात गतवर्षी ५ हजार ३ आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: Prepare the arsenic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.