घटनेची प्रास्ताविका मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:29 AM2017-11-27T00:29:01+5:302017-11-27T00:29:46+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे.

Presentation guide for the event | घटनेची प्रास्ताविका मार्गदर्शक

घटनेची प्रास्ताविका मार्गदर्शक

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : एससी मोर्चातर्फे संविधान पुस्तक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे. त्यामुळे राज्य घटनेची प्रास्ताविका एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. राज्यघटनेचे संपूर्ण सार प्रास्ताविकेत अंतर्भूत आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केले.
भाजपच्या वतीने खासदार नेते यांच्या कार्यालयासमोर संविधान दिनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद भुरसे, अनिल पोहणकर, डॉ. भारत खटी, दामोधर अरगेला आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा शाखा गडचिरोलीच्या वतीने खासदार नेते यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाजी लाटकर, संचालन एससी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी. के. मेश्राम यांनी तर आभार सिध्दार्थ नंदेश्वर यांनी मानले. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Presentation guide for the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.