जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचे मुंबईत सादरीकरण
By admin | Published: June 3, 2016 01:19 AM2016-06-03T01:19:29+5:302016-06-03T01:19:29+5:30
एमपीएसपी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हापर्यायी समन्वयकांची सभा शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
समन्वयकांची सभा : शालेय शिक्षण सचिवांकडून उपक्रमांचे कौतुक
भामरागड : एमपीएसपी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हापर्यायी समन्वयकांची सभा शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व भामरागड तालुक्याचे साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी केले.
मागील शैक्षणिक सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती अधिक गतीमान झाली. वरिष्ठांच्या कार्य प्रेरणेतुन शिक्षकांनी विपरीत परिस्थितीत जिल्ह्यात एकप्रकारे शैक्षणिक क्रांतीला सुरवात झाली. सर्व शाळा ज्ञानरचनावादी झाल्या. तसेच मोबाईल डिजीटल होऊन शिक्षक तंत्रस्नेही झालेत. ज्ञानरचनावादी पध्दतीने शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी स्वत:हून शिकू लागलेत. शाळा बाह्य मुले शाळेच्या मुख्य प्रवाहात आलीत. विद्यार्थीच्या गुणवत्तेत ७० ते ८० टक्के वाढ झाली. याविषयीचे सविस्तर सादरीकरण चांगदेव सोरते यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील शिक्षण प्रक्रियेत होत असलेला बदल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ याबद्दल सर्व प्रतिनिधींसह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनीसुध्दा समाधान व्यक्त करून सोरते यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
पर्यायी शिक्षण अंतर्गत राज्यात हंगामी वसतीगृह योजना, विशेष प्रशिक्षण व निवासी वसतिगृह योजना याविषयी चर्चा करण्यात आली. एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, याकरिता अचूक सर्वेक्षण करा, शिक्षण हमी कार्ड, स्थलांतरीत विद्यार्थी याविषयीचा आढावा व मार्गदर्शन राज्य समन्वयिका प्रज्ञा जोशी यांनी केले. मुले शंभर टक्के शिकू शकतात त्याला शिकवा व प्रगत करा असा विश्वास शालेय शिक्षण सचिव यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केला. नवीन शैक्षणिक सत्रात १०० टक्के गुणवत्तेचा ध्यास घेण्याच ेआवाहन त्यांनी केले.