गडचिरोलीतील सेवेसाठी पाच पोलीस अधिकाऱ्यांसह १६ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:49+5:302021-08-15T04:37:49+5:30
पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. ...
पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षीसुध्दा गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी मिळून २१ जणांना हा सन्मान मिळाला आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एका अधिकाऱ्याला पोलीस पदक जाहीर झाले.
(बॉक्स)
पदकप्राप्त अधिकारी
शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये गडचिरोलीचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मंजुनाथ हुचप्पा सिंगे (भापोसे), तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. (भापोसे) (सध्या अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक), तत्कालीन डीवायएसपी नवनाथ ठकाजी ढवळे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील, उपनिरीक्षक सुदर्शन सुरेश काटकर या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोतीराम बक्काजी मडावी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले.
(बॉक्स)
पदकप्राप्त कर्मचारी
शौर्यपदक मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार लिंगनाथ ननैय्या पोरतेट, हवालदार रोहिदास सिलुजी निकुरे, नायक अरविंदकुमार पुरनशाह मडावी, मोरेश्वर पत्रू बेलादी, प्रवीण कुलसाम, सडवली शंकर आसाम, आशिष देवीलाल चव्हाण तसेच शिपाई बिच्चू पोचव्या सीडाम, श्यामसाब ताराचंद कोडापे, नितेश गंगाराम बेलादी, पंकज सीताराम हलामी, आदित्य रवींद्र मडावी, रामभाऊ मनुजी हिचामी, मंगलशाह जीवन मडावी, ज्ञानेश्वर देवराम गावडे, शिवा पुंडलिक गोरले आदींचा समावेश आहे.