१२ पाेलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शाैर्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:31+5:302021-02-05T08:55:31+5:30
गडचिराेली : विविध प्रकारच्या कर्तव्यांमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या गडचिराेली पाेलीस दलातील १२ पाेलीस अधिकारी व अमलदार यांना राष्ट्रपती पाेलीस ...
गडचिराेली : विविध प्रकारच्या कर्तव्यांमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या गडचिराेली पाेलीस दलातील १२ पाेलीस अधिकारी व अमलदार यांना राष्ट्रपती पाेलीस शाैर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती पाेलीस शौर्य पदक जाहीर झालेल्यांमध्ये अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे व सध्या बीडचे पाेलीस अधीक्षक असलेले राजा आर, अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) पदाचा कार्यभार सांभाळलेले व सध्या अमरावती ग्रामीणचे पाेलीस अधीक्षक डाॅ. हरीबालाजी एन. यांच्यासह सहायक पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पाेलीस हवालदार महादेव मराेती मडावी, नापाेशि कमलेश अशाेक अर्का, अमूल श्रीराम जगताप, वेल्ला काेरके आत्राम, गिरीष माराेती ढेकले, निलेश माराेती ढुमणे, हेमंत काेरके मडावी, सुधाकर मलय्या माेगलीवार, बीयेश्वर विष्णू गेडाम यांचा समावेश आहे. गडचिराेली पाेलीस दलातील अधिकारी व जवान सर्वाधिक राष्ट्रपती पाेलीस शाैर्य पदक प्राप्त करतात. ही परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे.