गडचिराेली जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’
By दिगांबर जवादे | Published: August 14, 2023 08:45 PM2023-08-14T20:45:49+5:302023-08-14T20:46:16+5:30
गडचिराेली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील ३३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर ...
गडचिराेली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीपोलिस दलातील ३३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकूण २२९ पोलिस शौर्य पदक जाहीर झाले. त्यापैकी गडचिरोली पोलिस दलास सुमारे ३३ पोलिस शौर्य पदक जाहीर हाेणे ही निश्चितच गडचिरोली पोलिस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला २९ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक प्राप्त झाले होते. वर्षभरात एकूण ६२ पोलिस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक प्राप्त प्राप्त झाले आहे.
सहायक पाेलिस निरीक्षक रोहित फारणे, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, सहायक फाैजदार सुरपत वड्डे, मसरू कोरेटी, पोलिस हवालदार दृगसाय नरोटे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुराम, मुकेश उसेंडी, पोलिस नाईक विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, देविदास हलामी, महारू कुळमेथे, चंद्रकांत ऊईके, पोदा आत्राम, किरण हिचामी, पोलिस अंमलदार दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडाप, वारलू आत्राम, माधव तिम्मा, नरेश सिडाम, रोहिदास कुसनाके, नितेश दाणे, कैलास कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार, मुकुंद राठोड, नागेश पाल यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. मर्दीनटोला येथे झालेल्या पोलिस नक्षल चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे.