शिवाजी विद्यालयात शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:28+5:302021-09-06T04:40:28+5:30
शालेय प्रशासन चालवित असतानासुद्धा मुख्याध्यापकांना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांचाही मोठा वाटा असतो. २० ...
शालेय प्रशासन चालवित असतानासुद्धा मुख्याध्यापकांना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांचाही मोठा वाटा असतो. २० टक्के वेतन घेऊन मागील ११ वर्षांपासून शाळेतील सर्व शिक्षक सातत्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाचा हा गौरव आहे, असे गौरवाेद्गार प्रभारी मुख्याध्यापक व्ही. एम. दुनेदार यांनी अध्यक्षस्थानाहून काढले. कार्यक्रमाला सहायक शिक्षक के. आर. गजापुरे, डी. एल. चुलपार, एन. जी. शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी ईशा विजय लोणारे, तर आभार कावेरी सुभाष दुनेदार हिने मानले. यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी नीलकंठ मारबते, संदीप शेंडे, मिलिंद मेश्राम यांनी सहकार्य केले.
050921\img20210905084936.jpg
तुळशी येथिल शिवाजी विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम,दुनेदार शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करतांना