प्राथमिक आराेग्य केंद्रांना डाॅक्टर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:58+5:302021-03-07T04:33:58+5:30
गडचिराेली जिल्ह्यात एकूण ४८ प्राथमिक आराेग्य केंद्रे आहेत. त्यामध्ये गट अ ची ७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६६ पदे ...
गडचिराेली जिल्ह्यात एकूण ४८ प्राथमिक आराेग्य केंद्रे आहेत. त्यामध्ये गट अ ची ७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६६ पदे भरली असून नऊ पदे रिक्त आहेत. भरलेल्या एकूण ६६ पदांमध्ये ५१ नियमित, १३ कंत्राटी तर दोन एक वर्षाच्या करारावर आहेत. तसेच ६६ पैकी ४८ डाॅक्टर एमबीबीएस आहेत. तर, १८ डाॅक्टर बीएएमएस आहेत. गट ब ची ७५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये २९ पदे भरली असून ४६ पदे रिक्त आहेत.
बाॅक्स
तीनऐवजी दाेनच डाॅक्टर
प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ३० ते ४० गावे येतात. या गावांमधील लाेकसंख्या जवळपास २० हजार राहते. या गावांमध्ये अनेक आराेग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशावर्कर आराेग्य सेवा देतात. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डाॅक्टरांची राहते. तसेच आराेग्य केंद्रांत दाखल झालेल्या रुग्णाला तपासून त्याच्यावर उपचारही करावे लागतात. त्यामुळेच काही प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये तीन डाॅक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, पदे रिक्त असल्याने दाेनच डाॅक्टर देण्यात आले आहेत.
गट ब ची निम्म्याहून अधिक पदे रिक्त
गट ब ची एकूण ७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २९ पदे भरण्यात आली असून सुमारे ४६ पदे रिक्त आहेत. गट ब च्या डाॅक्टरांची पदे भरण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रे ४८
डाॅक्टरांची मंजूर पदे १५०
रिक्त पदे ५५.