प्राथमिक शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

By admin | Published: September 22, 2016 02:23 AM2016-09-22T02:23:04+5:302016-09-22T02:23:04+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली न काढल्याच्या कारणावरून धानोरा पंचायत समितीअंतर्गत

Primary teachers started unrestrained chain fasting | प्राथमिक शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

प्राथमिक शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Next

धानोरात आंदोलन : प्रशासनाच्या विरोधात तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या
धानोरा : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली न काढल्याच्या कारणावरून धानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर बुधवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
धानोरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या धोरणांमुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सामूहिक व वैयक्तिक समस्या निकाली निघाल्या नाहीत. शिक्षकांचे वेतन उशिरा करणे, सेवा पुस्तक अद्यावत न करणे, रजा प्रकरणे व नियमिततेच्या प्रस्तावात त्रूटी करणे, थकबाकी वेतन प्रकरणे आदी प्रकरणांवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची वारंवार गळचेपी केली जात आहे, असा आरोप करीत शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले. यापूर्वीही शिक्षक संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला वारंवार निवेदने सादर करण्यात आली. परंतु शिक्षकांच्या निवेदनाची दखल कार्यालयाने घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निकाली निघणार नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगीत करणार नाही, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. साखळी उपोषणाला डंबाजी पेंदाम, सुनील पनकंटीवार, आशिष धात्रक, प्रदीप उईके, दीपक भैसारे आदी शिक्षक बसले आहेत.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना, अप्रशिक्षित शिक्षक कृती समिती व शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Primary teachers started unrestrained chain fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.