गडचिरोलीच्या विकासाकडे पंतप्रधानांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:37 AM2018-03-04T00:37:20+5:302018-03-04T00:37:20+5:30

मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.

Prime Minister's attention to the development of Gadchiroli | गडचिरोलीच्या विकासाकडे पंतप्रधानांचे लक्ष

गडचिरोलीच्या विकासाकडे पंतप्रधानांचे लक्ष

Next
ठळक मुद्देलवकरच होणार जिल्ह्याचा कायापालट : गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा विश्वास

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : मागास असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील ११५ जिल्हे निवडले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील चार जिल्हे असून यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या विकासाकडे पंतप्रधान स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट झाला असेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील उतारा वाचन कार्यक्रमापूर्वी आयोजित बिरसा मुंडा यांच्या वंशजांच्या सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) हरी बालाजी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा, बुधराम मुुंडा, सुखराम मुंडा यांच्या मुली चंपा व जौनी मुंडा उपस्थित होत्या. यावेळी हंसराज अहीर यांच्या हस्ते मुंडा कुटुंबिय व कार्यक्रमाचे आयोजन करणाºयांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले, सीआरपीएफची गरज देशाच्या सीमेवर आहे. मात्र नक्षलवाद्यांमुळे ही फौज गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात वापरावी लागत आहे.
यापूर्वी आदिवासींवर अन्याय होत असल्याने नक्षलवादाची गरज होती. मात्र स्वातंत्र्यानंतर आता दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी शासन सदैव तत्पर आहे. त्यामुळे आता नक्षलवादाची गरज उरलेली नाही. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे मार्गदर्शन केले.

Web Title: Prime Minister's attention to the development of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.