लोहार समाजाच्या समस्या प्राधान्याने साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:37 AM2021-04-04T04:37:29+5:302021-04-04T04:37:29+5:30
गडचिरोली : प्राचीन काळापासून बारा बलुतेदारामध्ये समावेश असलेल्या लोहार समाजाचा २१व्या शतकातही पुरेशा प्रमाणात विकास झाला नाही. त्यामुळे ...
गडचिरोली : प्राचीन काळापासून बारा बलुतेदारामध्ये समावेश असलेल्या लोहार समाजाचा २१व्या शतकातही पुरेशा प्रमाणात विकास झाला नाही. त्यामुळे वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरच्या वतीने खासदार अशोक नेते यांना तब्बल २४७ पानांचे निवेदन सादर करून लोहार समाजाच्या समस्याकडे खासदार नेते यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नेते यांच्याशी विविध बाबींवर चर्चा केली. लोहार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी क्रेंद व राज्य शासनाच्यावतीने विविध योजनांचा लाभ या समाजाला देण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी विशेष सवलती देण्यात याव्यात आणि विशेष योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे करण्यात आली. खासदार अशोक नेते यांनी लोहार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे सांगितले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे सचिव सुरेश मांडवगडे यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख धर्मदास नैताम, सदस्य मनोहर सोनटक्के, सुधाकर पेटकर, सुनीता सोनटक्के, राजेश सोनटक्के, नरेश बावणे, टिकाराम सोनटक्के,नरेश हजारे, शालीकराम बावणे, अनिता कुमरे, स्वाती चंदनखेडे, प्रभूजी वकेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.