जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या!
By admin | Published: April 17, 2017 01:44 AM2017-04-17T01:44:16+5:302017-04-17T01:44:16+5:30
सिंचन व उद्योगविरहित असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या
मुख्यमंत्र्यांना निवेदन : कुरखेडा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
कुरखेडा : सिंचन व उद्योगविरहित असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करून जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कुरखेडा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कुरखेडा तालुक्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे सिंचनाची सोय करण्यासाठी इटियाडोह प्रकल्पाचा डावा कालवा केशोरी, इळदा, वडेगाव मार्गे तालुक्यात आणावा, ३५ वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने सोनेरांगी, बामणी, जांभुळखेडा, भगवानपूर आदी लघुसिंचन प्रकल्पाचीही गती मंदावली आहे. या प्रकल्पांना गती द्यावी, राज्यासह जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवाव्या, प्रत्येक जि. प. स्तरावर समाजकल्याणच्या धर्तीवर ओबीसी कल्याण विभाग स्थापन करून या विभागाला स्वतंत्र निधी व स्वतंत्र सभापतीपद द्यावे, तसेच ओबीसी बांधवांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावाव्या, राज्यातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा व पालिका स्तरावर पाच रूपयांत नाश्ता व दहा रूपयांत भोजन देणारी मुख्यमंत्री कँटीन योजना सुरू करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन नागपूर येथे पार पडलेल्या भाजपच्या ओबीसी प्रदेश आघाडीच्या बैठकीत विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवीकिरण समर्थ, सचिव भाष्कर बुरे, रोशनी बैस उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)
कुरखेडा शहराचे सौंदर्यीकरण करा
कुरखेडा शहरातील गांधी चौकात सभामंडप उभारावे, चौकाचे सौंदर्यीकरण नगर विकास मंत्रालयाकडून करावे, तसेच अडीच वर्षे प्राचीन असलेल्या हनुमान मंदिराची पुनर्उभारणी करावी. लगतच्या तलावाचे सौंदर्यीकरण करावे, कुरखेडा येथे सुविधायुक्त क्रीडा संकूल उभारावे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके यांच्या विरंगुळ्यासाठी वन विभागाच्या जैवविविधता उद्यानाची निर्मिती करावी,