शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:24 AM2018-06-10T00:24:37+5:302018-06-10T00:24:37+5:30
विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याला शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
चामोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, नायब तहसीलदार सुधाकर बावणे, तनगुलवार, जि. प. सदस्य रमेश बारसागडे, विद्या आभारे, सभापती आनंद भांडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, रमेश अधिकारी, माणिकराव तुरे, गुंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. देवराव होळी म्हणाले, शासनाने ६ जून २०१८ ला शासन निर्णय काढला आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकºयांनी आपल्या वर्ग २ च्या जमिनी सहा महिन्याच्या आत वर्ग १ करून घ्यावे. त्याचबरोबर अतिक्रमणधारकांनी प्रॉपर्टी कार्ड भरून जमीन आपल्या नावे करावी. बंगाली बांधवांच्या जमिनीची मोजणी झाली असून त्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, ३५ हजार कोटी रूपयांचे कर्ज शासनाने माफ केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अजून जमा झाली नाही त्यांना लवकरच कर्जमाफी देण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत, शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या हिताला राज्य व केंद्र शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
तालुका कृषी विभागाकडून चार लाभार्थ्यांना तुरीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.