शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:18+5:302021-07-05T04:23:18+5:30

कुरखेडा येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व पदाधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून वनहक्क, शेतकऱ्यांचा रबी धान खरेदीचा प्रश्न साेडविल्याबद्दल ...

Priority to solve the problems of farmers | शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्यास प्राधान्य

शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्यास प्राधान्य

Next

कुरखेडा येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व पदाधिकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून वनहक्क, शेतकऱ्यांचा रबी धान खरेदीचा प्रश्न साेडविल्याबद्दल व खरेदीस मुदतवाढ मिळवून दिल्याबद्दल पंचायत समितीच्या सभागृहात आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक खेमनाथ डोंगरवार हाेते. यावेळी आविका संस्थेचे उपाध्यक्ष तथा पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, गोठणगावचे सभापती यशवंत चौरीकर, कढोली आविकाचे अध्यक्ष फाल्गुन चौके, आंधळीचे उपसभापती विनोद खुणे, कुरखेडाचे अध्यक्ष बाबूराव तुलावी, देऊळगाव आविकाचे अध्यक्ष अशोक मडावी, आविका घाटीचे अध्यक्ष टेकाम, गेवर्धाचे आविका उपाध्यक्ष पिल्लारे, देऊळगावचे उपसभापती शेख, पलसगडचे तुलावी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत शेंदरे आदी उपस्थित हाेते. आमदार गजबे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद खुने यांनी, तर सूत्रसंचालन माणिक दरवडे यांनी केले. आभार महेंद्र मेश्राम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक हेमंत शेंदरे, महेंद्र मेश्राम, लीलाधर घोसेकर, जी. एस. मदनकर, नरेंद्र पटने, घनश्याम ठलाल, राकेश मत्ते, बी. डी. बोरसरे, आर. बी. मस्के, कपिल तुलावी, सूरज बोरसरे यांचे सहकार्य लाभले.

040721\04gad_2_04072021_30.jpg

आ. कृष्णा गजबे यांचा सत्कार करताना आविका संस्थेचे पदाधिकारी.

Web Title: Priority to solve the problems of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.