अतिदुर्गम भागातील प्रियंका दासरी बनणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 08:00 AM2021-10-14T08:00:00+5:302021-10-14T08:00:02+5:30

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम झिंगानूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन सिरोंचाची कन्या प्रियंका स्वामी दासरी हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे

Priyanka Dasari will be the officer in the remote area | अतिदुर्गम भागातील प्रियंका दासरी बनणार अधिकारी

अतिदुर्गम भागातील प्रियंका दासरी बनणार अधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देखुल्या प्रवर्गातून सहावा क्रमांकएमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

गडचिरोली : जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील व अतिदुर्गम झिंगानूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन सिरोंचाची कन्या प्रियंका स्वामी दासरी हिने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे प्रियंकाने एमपीएससी परीक्षेत खुल्या प्रवर्गातून सहावा क्रमांक मिळविला आहे. (Priyanka Dasari will be the officer in the remote area)

प्रियंकाचा जन्म सिरोंचा येथे झाला. प्रियंकाचे वडील पोलीस शिपाई असून त्यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन संतती आहे. प्रियंकाच्या वडिलांना पोलीस शिपाई म्हणून अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागातील पोलीस ठाण्यात सेवा बजावली. प्रियंकाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण सिरोंचा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा झिंगानूर येथे झाले. धर्मराव विद्यालय सिरोंचा येथे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चंद्रपूर येथील विद्यानिकेतन ज्युनिअर महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी तिने नागपूर गाठले. एमपीएससी परीक्षेत प्रियंकाने यश मिळविले.

यापूर्वी तालुक्यातून बनले चार अधिकारी

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून यापूर्वी सिराेंचा तालुक्यातून चार अधिकारी बनले आहेत. यामध्ये वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार, सध्या चंद्रपूर येथे तहसीलदार असलेले जितेद् गादेवार, हे दोघेही भाऊ आहेत.

पोलीस उपनिरीक्षक जितेश आरेवली चारी आणि सहायक वनसंरक्षक चिनुरी विलास रेगुंठा आदींचा समावेश आहे.

Web Title: Priyanka Dasari will be the officer in the remote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.