चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:19 AM2020-12-28T04:19:15+5:302020-12-28T04:19:15+5:30
आरमोरी : नगर परिषद आरमोरीतर्फे ‘माझी वसुंधरा व स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला ...
आरमोरी : नगर परिषद आरमोरीतर्फे ‘माझी वसुंधरा व स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा तसेच इयत्ता नववी ते खुल्या गटातील नागरिकांकरिता भिंती पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण २४ डिसेंबरला नगर परिषद कार्यालयात करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेचे प्रथम १ हजार १११ रूपयांचे बक्षीस रेणू ज्ञानेश्वर दुमाने, द्वितीय ७७७ रूपयांचे बक्षीस शरयू राजेश किरमे, तृतीय ५५५ रूपयांचे बक्षीस समिधा राजेश किरमे हिने पटकाविले. पेटिंग स्पर्धेचे २ हजार २२२ रूपयांचे प्रथम बक्षीस शैलेंद्र चिंतामण गजिभये, १ हजार ५५५ रूपयांचे द्वितीय बक्षीस सायली राजू कानताेडे तर १ हजार ११ रूपयांचे तृतीय बक्षीस देवेंद्र माधवराव भालेराव यांनी पटाविले. दाेन्ही स्पर्धेत ७५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण मुख्याधिकारी डाॅ. माधुरी सलामे, कार्यालय अधीक्षक ओशिन मडकाम, स्वच्छता व आराेग्य अभियंता नितीन गाैरखेडे, लेखापाल संजय शेळके, लिपिक राजू कांबळे यांनी केले.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, मुख्याधिकारी माधुरी सलामे, न. प. सभापती भारत बावनथडे, विलास पारधी, नगरसेवक सुदाम माेटवानी, मिलिंद खाेब्रागडे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.