नक्षलवाद्यांना मोठया प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 01:26 PM2022-02-20T13:26:53+5:302022-02-20T13:34:28+5:30

Gadchiroli News : चार जणांकडून 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल एकूण 3500 मीटर लांबीचे व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले.

Pro-Naxal gang exposed for supplying large quantities of explosives to Naxals in Gadchiroli | नक्षलवाद्यांना मोठया प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश

नक्षलवाद्यांना मोठया प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश

Next

नक्षलवाद्यांना मोठया प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणा­ऱ्या नक्षल समर्थक टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील मौजा भंगारामपेठा गावात पोउपनि सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. याच दरम्यान तेलंगणामध्ये दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे वाहतूक करीत असलेल्या चार जणांकडून 10 नग कार्डेक्स वायरचे बंडल एकूण 3500 मीटर लांबीचे व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले.

नक्षलवादयांना सदरचे साहित्य पुरवठा करणा­ऱ्यांमध्ये राजु गोपाल सल्ला (वय 31 वर्षे रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनि, जि. करीमनगर तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय 24 वर्षे रा. भंगारामपेठा ता. अहेरी, साधु लच्चा तलांडी (वय 30 वर्षे), मोहम्मद कासिम शादुल्ला (रा. एनटीआर तामिल कॉलनि, बाबुपेठ, आसिफनगर जि. करीमनगर तेलंगणा), छोटू ऊर्फ सिनु मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा ता. अहेरी) यांचा समावेश आहे.  तसेच मौजा भंगाराम पेठा येथील रहिवासी असलेला आरोपी छोटू मुल्ला गावडे फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडून कसून तपास करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताह दरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठया प्रमाणात वापर केला जाणार होता.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन घोडके प्रभारी अधिकारी उपपोस्टे दामरंचा यांचे नेतृत्वात पार पडली. कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणा­ऱ्या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
 

Web Title: Pro-Naxal gang exposed for supplying large quantities of explosives to Naxals in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.