समितीने जाणल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:40 PM2019-07-04T22:40:39+5:302019-07-04T22:40:53+5:30
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी २ व ३ जुलै रोजी आदिवासी आढावा समिती जिल्ह्यात दाखल झाली. सदर समितीच्या सदस्यांनी बुधवारी घोट येथे दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी २ व ३ जुलै रोजी आदिवासी आढावा समिती जिल्ह्यात दाखल झाली. सदर समितीच्या सदस्यांनी बुधवारी घोट येथे दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी प्रामुख्याने आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, अतिरिक्त आदिवासी आयुक्त संदीप राठोड, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, उपविभागीय अधिकारी विजया जाधव, चामोर्शीचे तहसीलदार गंगथडे, संवर्ग विकास अधिकारी नितेश माने, घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, प्रमुख प्रवक्ता प्रमोद पवार, सहकारी अशोक सापटे, रूपेश किर, स्नेहा घरत, पूजा सुरूंग आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर समितीच्या सदस्यांनी घोट येथील वनविभागाच्या अगरबत्ती प्रकल्पास व रोपवाटिकेस भेट देऊन त्याची पाहणी केली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच गांडूळ खत प्रकल्प व वसुंधरा जैव विविधता उद्यानास भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते जैव विविधता उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या ठिकाणी विविध रोपट्यांची लागवड करण्यात आली. आदिवासी विकास विभाग व वनविभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय, हे तपासले.