जारावंडी भागात कव्हरेजची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:29+5:302021-04-27T04:37:29+5:30
एटापल्ली : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. जारावंडी भागात अनेक पालकांकडे अँड्रॉईड तर सोडाच साधे ...
एटापल्ली : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. जारावंडी भागात अनेक पालकांकडे अँड्रॉईड तर सोडाच साधे मोबाईलसुद्धा नाहीत. तसेच या भागात कव्हरेजची समस्या असल्याने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
गडचिराेली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे केली आहे.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
कमलापूर : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
पं.स. गणस्तरावर विकासासाठी निधी द्या
आष्टी : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून पंचायत समितीला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने महत्त्व कमी झाले आहे. पंचायत समितीच्या गण स्तरावर निधी उपलब्ध करून दिल्यास गणांचा विकास होण्यास मदत होईल.
पट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा द्या
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी आहेत.
बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बºया प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होण्यासाठी मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांना बायोगॅससाठी अनुदान वाढवून द्यावे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिक त्रस्त आहेत.