मुंगनेर परिसरात कव्हरेजअभावी अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:07+5:302021-03-07T04:33:07+5:30
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेेडच्या वतीने जिल्हाभर भ्रमणध्वनी टाॅवर उभारण्यात आले. मात्र दुर्गम भागात टाॅवर उभारणीकडे दुर्लक्ष झाले. काही टाॅवर ...
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेेडच्या वतीने जिल्हाभर भ्रमणध्वनी टाॅवर उभारण्यात आले. मात्र दुर्गम भागात टाॅवर उभारणीकडे दुर्लक्ष झाले. काही टाॅवर उभारण्यात आले व बॅटऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र मुंगनेर भागात भ्रमणध्वनी मनाेऱ्याचा अभाव आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी व दूरध्वनीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उंच जागेचा आधार घेऊन संपर्क साधावा लागताे.
या भागात बीएसएनएल व इतर खासगी कपंन्यांचे कव्हरेज नसल्याने संपर्काची समस्या बिकट बनली आहे. मुंगनेर परिसरात बाेदीनसह आठ ते नऊ गावे आहेत. या गावातील नागरिकांचा मुंगनेरशी अनेकदा संपर्क येताे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने कव्हरेजची समस्या अद्यापही सुटली नाही. या ठिकाणी टाॅवर उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स.....
ऑनलाइन दाखल्यांसाठी पायपीट
मुंगनेर या अतिदुर्गम भागाचा विकास राखडला आहे. विद्युत समस्याही निर्माण झाली आहे. सध्या शासकीय याेजनांची अंमलबजावणी, इतर सर्व कामे ऑनलाइन करावी लागत आहेत. अनेक माेबाइलधारक स्मार्ट फाेनच्या माध्यमातून ऑनलाइन कामे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या भागात कव्हरेज नसल्याने विद्यार्थी व नागरिकांना ऑनलाइन दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. धानाेरा तसेच पेंढरी येथे जाऊन कामे करावी लागत आहेत. यात शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.