कोटगूल परिसरात अनियमित वीज पुरवठ्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:14+5:302021-03-09T04:39:14+5:30
कोरची : तालुक्याचा बहुतांश भाग अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. घनदाट जंगलाने तालुका व्यापला असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत ...
कोरची : तालुक्याचा बहुतांश भाग अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. घनदाट जंगलाने तालुका व्यापला असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत सुरू करण्यास बराच वेळ लागतो. दुर्गम भागात महावितरण कंपनीने नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून कोटगूल क्षेत्र छत्तीसगड सीमेला लागून जवळपासू ३० किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी या भागात पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच या क्षेत्रातील सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने या समस्याकडे लक्ष देऊन ती निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काेरची तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक गावे जंगलालगत असून झाडांना चिपकून आहेत. परिणामी हलकेसे वादळ आल्यास वीज पुरवठा खंडित हाेताे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. या तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. महावितरणने उपाययाेजना करावी.