नालीअभावी सांडपाण्याची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:29+5:302021-09-27T04:40:29+5:30
चामोर्शी : चामोर्शी शहरातील गणेशनगर प्रभाग क्रमांक १३ मध्ये नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाण्याची समस्या ...
चामोर्शी : चामोर्शी शहरातील गणेशनगर प्रभाग क्रमांक १३ मध्ये नाली व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
या वाॅर्डातील बंडू पत्तीवार ते बंडू लिंगे यांच्या घरापर्यंत कच्चा रस्ता आहे. पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला पाणी साचून राहते. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना, तसेच पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात यावे व याच परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डुकराचे साम्राज्य वाढत आहे. डुकरांचा वावर राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.