पाेलीस महासंचालकांनी जाणल्या नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:07+5:302021-03-01T04:43:07+5:30

यावेळी त्यांच्यासाेबत गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सोमय मुंडे ...

The problems of the personnel deployed in the Naxal-affected areas were known to the Director General of Police | पाेलीस महासंचालकांनी जाणल्या नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांच्या समस्या

पाेलीस महासंचालकांनी जाणल्या नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांच्या समस्या

Next

यावेळी त्यांच्यासाेबत गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सोमय मुंडे ,जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. दाैऱ्यादरम्यान पाेलीस महासंचालकांनी संपूर्ण पाेलीस स्टेशनच्या परिसराची पाहणी केली. या परिसरात पाेलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचे भूमिपूजन महासंचालकांच्या हस्ते करण्यात आले. नव्या इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. देचलीपेठा पोलीस ठाण्याला भेट देणारे ते पहिले पोलीस महासंचालक आहेत .गडचिरोली पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते हेलिकॉप्टरने जिमलगट्टा येथे दाखल झाले.

माेबाईल कव्हरेज नसल्यामुळे जवान त्रस्त

बहुतांश पाेलीस जवानांचे कुटुंब साेबत नाही. कुटुंबीयांसाेबत बाेलण्यासाठी या भागात मोबाईलचे कव्हरेज उपलब्ध नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या यासह काही समस्या कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडल्या. या सगळ्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्याचे आश्वासन पोलीस महासंचालक यांनी दिले.

Web Title: The problems of the personnel deployed in the Naxal-affected areas were known to the Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.