आमदारांनी जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:43+5:30

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आवश्यक असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. जनतेची काय स्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी आमदारांनी ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किराणा दुकाने, भाजीपाला बाजार, रेशन दुकाने आदी ठिकाणांना भेटी दिल्या.

Problems realized by legislators | आमदारांनी जाणल्या समस्या

आमदारांनी जाणल्या समस्या

Next
ठळक मुद्देमदत करण्याचे आश्वासन : चामोर्शीतील विविध ठिकाणांना दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी शहरातील विविध ठिकाणांना भेटी देऊन व्यापारी, विक्रेते, पोलीस, नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आवश्यक असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. जनतेची काय स्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी आमदारांनी ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, किराणा दुकाने, भाजीपाला बाजार, रेशन दुकाने आदी ठिकाणांना भेटी दिल्या. व्यापारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. गुजरी बाजार व फळ विक्रेत्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, नगर पंचायत गटनेते प्रशांत एगलोपवार, जयराम चलाख, प्रतिक राठी, तहसीलदार संजय गंगथडे आदी उपस्थित होते.

अडकलेल्यांना मदत
शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात अडकलेल्या नागरिकांना मदत आवश्यक असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी चामोर्शी येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
 

Web Title: Problems realized by legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.