सहविचार सभेत जाणल्या शिक्षकांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:40 AM2021-09-26T04:40:09+5:302021-09-26T04:40:09+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष काशीनाथ दुधबळे हाेते. यावेळी संस्थापक-अध्यक्ष दिवंगत वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ...
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष काशीनाथ दुधबळे हाेते. यावेळी संस्थापक-अध्यक्ष दिवंगत वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने काशीनाथ दुधबळे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्याध्यापक दिलीप डांगे यांनी उपस्थित मान्यवरांना शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. सभेचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. धनंजय गाडेवार यांनी केले. सभा संपल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक डांगे यांनी शिक्षक प्रतिनिधी निवडीचा प्रस्ताव मांडला व एकमताने शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरुण चौधरी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मधुकर जाधव, संतोष सुरावार, गोकुळदास झाडे, प्रा. अरुण खरवडे, प्रा. देवानंद बोरकर, प्रा. आशिष येणोरकर, प्रा. कविता उंदीरवाडे, प्रा. मोरेश्वर आभारे, वसंत सुरपाम, अशोक कोहळे, आशा भागेवाड, अर्चना पोलशेट्टीवार, सुमित बोरकर, भोपासिंग पवार, रोशन थोरात, गुणवंत श्रीरामे, प्रशांत घरत, सौदागर चौधरी, मुख्य लिपिक राकेश गेडाम, कनिष्ठ लिपिक माया वाढई, जीवन मडावी, जयप्रकाश शिंदे, पौर्णिमा खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.
250921\img_20210925_112916.jpg
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार करतांना शाळा समिती अध्यक्ष