कृषी महोत्सवाची कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:47 PM2018-02-03T23:47:41+5:302018-02-03T23:48:28+5:30

कृषीविषयक ज्ञान व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना केवळ व्याख्याने व प्रबोधन वर्गाने साध्य होणार नाही, तर कृषी महोत्सवाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी, उद्योजक व तज्ज्ञ यांची समग्र चर्चा घडवून सकारात्मक मुद्यावर कार्यवाही करावी,....

Proceed to the Agricultural Festival | कृषी महोत्सवाची कार्यवाही करा

कृषी महोत्सवाची कार्यवाही करा

Next
ठळक मुद्देनियोजन बैठक : जिल्हाधिकाºयांचे अधिकाºयांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषीविषयक ज्ञान व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना केवळ व्याख्याने व प्रबोधन वर्गाने साध्य होणार नाही, तर कृषी महोत्सवाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी, उद्योजक व तज्ज्ञ यांची समग्र चर्चा घडवून सकारात्मक मुद्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी महोत्सवाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने नियोजन बैठक घेण्यात आली. दरम्यान जिल्हा शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य अनिल म्हशाखेत्री, गिरीश मद्देर्लावार, वंदना गावडे यांचे विचार जाणून घेण्यात आले.
कार्यक्रमात कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विकास अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, दुग्ध विकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, रेशीम उद्योग विकास अधिकारी यांनी आयोजित करावयाच्या स्टॉलविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रकल्प संचालक व ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने एकत्रित नियोजन करण्याचे बैठकीत कळविण्यात आले. तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या नियमक मंडळाची बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.
जि.प. सीईओंची अधिकाऱ्यांना सूचना
या बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महोत्सवात बचतगटांची प्रदर्शनी व विक्रीबरोबरच ग्रामीण रोजगार निर्मिती व उन्नत पशुधनाचे प्रदर्शन ठेवण्याबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: Proceed to the Agricultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.