दोन एकरात १ हजार ९०० क्विंटल फूलकोबीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:33 AM2021-04-05T04:33:20+5:302021-04-05T04:33:20+5:30

चामोर्शी : श्रम करण्याची इच्छा तसेच जिद्द असल्यास काेणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. असेच काहीसे यश चामाेर्शी तालुक्याच्या भाेगनबाेडी ...

Production of 1,900 quintals of cauliflower in two acres | दोन एकरात १ हजार ९०० क्विंटल फूलकोबीचे उत्पादन

दोन एकरात १ हजार ९०० क्विंटल फूलकोबीचे उत्पादन

Next

चामोर्शी : श्रम करण्याची इच्छा तसेच जिद्द असल्यास काेणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. असेच काहीसे यश चामाेर्शी तालुक्याच्या भाेगनबाेडी हेटी येथील एका शेतकऱ्याने मिळविले. शेतकरी गाेकुळ दिवरू वासेकर यांनी दाेन एकरात १ हजार ९०० क्विंटल फूूलकाेबीचे उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज आहे. पिकाच्या व्यवस्थापनासाठी त्यांना ५० हजार रुपये खर्च आला, तर त्यांना फूलकाेबीतून ३ लाखांवर उत्पन्न मिळणार आहे.

चामाेर्शी तालुक्यातील बहुतांश शेतकरी धान पिकासोबत भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. तालुक्याच्या भोगनबोडी हेटी येथील एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकरच्या शेतात फुलकोबीची लागवड केली. ती फुलकोबी आता निघण्यास सुरुवात झाली आहे. दोन एकरातून १ हजार ९०० क्विंटल उत्पन्न हाेणार असून, यातून त्यांना तीन लाख रुपये मिळणार आहेत. तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर भोगनबोडी हेटी हे गाव आहे. येथील शेतकरी गोकुळ वासेकर यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. वासेकर यांना लहानपणापासून शेती कसण्याची आवड आहे. वडिलोपार्जित शेत जमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी वासेकर यांनी दोन एकर शेतीतील सर्व्हे नं. ७, ८ व ९ मध्ये फूलकोबीची लागवड केली. यासाठी त्यांना ५० हजार रुपयांचा खर्च आला. फुलकोबी पिकाची चांगली देखभाल करून काळजी घेतल्यामुळे जवळपास १ हजार ९०० क्विंटल उत्पादन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वासेकर यांच्या शेतातील फुलकोबी पीक आता तोडणीला आले आहे. फूलकोबी विक्रीतून जवळपास ३ लाखांचे उत्पन्न वासेकर यांना मिळणार आहे. दिवसेंदिवस युवा पिढी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. मात्र, काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहेत. यामध्ये गोकुळ वासेकर हेसुदृधा आहेत. तसेच त्याच शेतीला लागून पडिक जमिनीत आंब्याची ४० झाडे आहेत. आंब्याच्या झाडांपासून एक लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. केसर, दशहरी, कलमी, नीलम आदी प्रजातींची आंब्याची झाडे आहेत. शेताजवळून बारमाही वाहात असलेल्या नाल्यावर मोटार पंप बसवून सिंचनाची सोय करण्यात आलेली आहे. या सिंचनाच्या पाण्यावर धान व भाजीपाल्याचे पीक ते घेतात. सिरोंचा, एटापल्ली, आलापल्ली, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यासह तेलंगणा राज्यातील भोपालपटनम या ठिकाणचे व्यापारी येऊन फूलकोबीची ठोक खरेदी शेतीतूनच करतात. तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत याच शेतात एकदिवसीय शेतीशाळा घेण्यात आली होती. शेतकऱ्यांनी धान पिकासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, असेही शेतकरी वासेकर सांगतात.

बाॅक्स

असे केले व्यवस्थापन

शेतकरी गाेकुळ वासेकर यांनी नागपूर येथून फूलकोबीची बिजाई आणली. प्रतिपॉकेट १० ग्रॅमप्रमाणे २ एकरसाठी १८० ग्रॅम बियाण्यांचा वापर त्यांनी केला. दाेन एकरात २ ट्रॅक्टर ट्राॅली शेणखत, सेंद्रीय खत ५० किलो, डीएपी खत २ बॅग, झिंक सल्फेट १० किलो, पोटॅश २० किलो अशा प्रकारे खताची मात्रा वासेकर यांनी शेतात दिली. याशिवाय त्यांनी पिकावर किडीचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी फवारणीसुद्धा केली.

Web Title: Production of 1,900 quintals of cauliflower in two acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.