सेंद्रिय खतामुळे उत्पादनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:13 AM2018-06-07T01:13:00+5:302018-06-07T01:13:00+5:30
सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सुंदरनगर येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, अनिल तारू, डॉ. विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, कृषी अधिकारी एस. डी. सुतार, पशुवैद्यकीय तज्ज्ञ संजय नाटके, कृषी सहायक सानप, आत्मा विभागाचे आकाश लवटे, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, ग्रा.पं. सदस्य सुभाष पटेल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संदीप कºहाळे यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आवश्यक शेतीविषयक ११ मार्गदर्शक विषयांची माहिती दिली. उत्पादनात वाढ व खर्चात कपात होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा, असे आवाहन केले. डॉ. विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालनाबाबत तसेच जनावरांच्या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. अनिल तारू यांनी शेतजमीन माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगती सुंदरनगर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.