केंद्रप्रमुखांना गट ‘ब’ पदावर पदाेन्नती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:18+5:302021-08-15T04:37:18+5:30
गडचिराेली : केंद्रप्रमुखांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर शिक्षण सेवा गट ‘ब’च्या पदांवर पदाेन्नती देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन शिक्षक ...
गडचिराेली : केंद्रप्रमुखांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर शिक्षण सेवा गट ‘ब’च्या पदांवर पदाेन्नती देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेने राज्य शासनाकडे सादर केले आहे.
केंद्रप्रमुख पदाचा समावेश सेवाश्रेणी तीन व वर्ग दाेनमध्ये करण्यात यावा. अतिरिक्त भार असलेल्या केंद्रप्रमुखांना त्या पदावर कायम करावे. १० जून २०१४ ची अधिसूचना रद्द करावी व केंद्रप्रमुख पदावर शिक्षकांकडून पदाेन्नतीने ६० टक्के व विभागीय परीक्षेद्वारे ४० टक्के भरती केली जाईल. केंद्रप्रमुखांना पदाेन्नतीची एक वेतनवाढ लागू करावी. समूहसाधन केंद्रासाठी एक परिचर व एक डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये केंद्रप्रमुखांना प्रतिनिधित्व द्यावे. १६५० रुपये प्रवास भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपादे यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष गाैतम मेश्राम, राज्य प्रतिनिधी नेताजी मेश्राम, विभाग प्रतिनिधी राजू काेत्तावार, कार्याध्यक्ष राजेश वडपल्लीवार, काेषाध्यक्ष विजय बन्साेड, सहसचिव सदानंद ताराम, उपाध्यक्ष बंडू खाेब्रागडे, तालुका प्रतिनिधी येलेश्वर काेमेरवार, किशाेर चव्हाण, प्रमाेद नंदनवार, हिम्मतराव आभारे आदी उपस्थित हाेते.