मत्स्य व्यवसायातून उन्नती साधा

By admin | Published: July 9, 2017 02:28 AM2017-07-09T02:28:01+5:302017-07-09T02:28:01+5:30

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. तलावातील पाणी

Promote fishery business | मत्स्य व्यवसायातून उन्नती साधा

मत्स्य व्यवसायातून उन्नती साधा

Next

‘तलाव तिथे मासोळी’ अभियानाचा शुभारंभ : पेरमिलीत पालकमंत्र्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. तलावातील पाणी साठ्याचा वापर करून शेती तसेच मत्स्य विकास सहकारी संस्थ्यांच्या माध्यमातून मत्स्यपालन पारंपरिक पद्धतीने करता येते. आता शासनाने ‘तलाव तिथे मासोळी’ अभियान सुरु केले असून यातून ग्रामीण भागातील मत्स्य उत्पादन घेणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न वाढणार आहे. तलाव म्हणजे सोन्याची खाण समजून मासोळीच्या उत्पन्नातून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे मामा तलावात मासे सोडून ‘तलाव तिथे मासोळी’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अनुपकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर, जि. प. सदस्य मनीषा गावडे, ऋषी पोरतेट, कैलास कोरेत, सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात तलावांची संख्या भरपूर आहे. तलाव तिथे मासोळी या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पेरमिली येथील तलावांची निवड ही उत्तम असून येथील मत्स्य उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ निश्चित स्वरूपात होईल, अशी आशा व्यक्त केली. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांकडे मासोळी संवर्धनासाठी तांत्रिक ज्ञान नसून त्यांच्याकडे साधनसामग्री अत्यल्प आहे. आता मत्स्य विभागाकडून मत्स्य जिरेपासून तर मासे संवर्धनासाठी साधनसामग्री पुरविण्यात येईल. ग्रामसभेने निर्णय घेऊन येथील तलावातील मासे संवर्धनासाठी जास्तीत जास्त लोकांचा समावेश करुन घ्यावा. पेरमिली परिसरातील मूलभूत समस्या सोडविल्या जातील, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.
जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी सामूहिकरित्या मत्स्यव्यवसाय करुन आपली आर्थिक उन्नती साधावी व उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार सीईओ शांतनू गोयल यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्रीकांत बंडमवार, बबन सडमेक, कविश्वर चंदनखेडे, रवी औतळ, किरण कोरेत, बंडू मडावी, गजानन मडावी यांनी सहकार्य केले. यावेळी पेरमिली, आलदंडी, कोरेली, चंद्रा, आरेंदा, चौडमपल्ली, कोडसेपल्ली, पल्ले, कुरूमपल्ली, कासमपल्ली, मिरकल, चकिनगट्टा, गुर्जा येथील नागरिक हजर होते.

शारीरिक वाढीसाठी मासोळी उपयुक्त- अनुपकुमार
मासोळी प्लवंग वनस्पती खाऊन जगत असते. त्याकरिता गाय, बैलाचे शेण, कोबंडीची विष्ठा, धानातील कुकुस तलावात टाकावे. यामुळे तलावात शेवाळ वाढून मासोळीची वाढ होण्यास व जगण्यास मदत होते. आपल्या खाद्य संस्कृतीत आहारात मासे खाणे हे प्रमुख घटक आहे. मासोळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे आपल्या शरिराची वाढ होते. तसेच बौद्धिक काम करण्यासाठी तल्लखता अधिक निर्माण होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.

 

Web Title: Promote fishery business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.