भाकरोंडी भागात सट्टा जुगार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:58 PM2018-06-04T22:58:19+5:302018-06-04T22:58:49+5:30
आरमोरी तालुक्याच्या टोकावर असलेले आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या भाकरोंडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरूष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे मालेवाडा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्याच्या टोकावर असलेले आणि मालेवाडा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या भाकरोंडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरूष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे मालेवाडा पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कुरखेडा येथील एक सट्टा व्यावसायीकाने भाकरोंडी, देवखडकी, बांदोना, बाजीराव टोला, भांसी, खांबाडा, मुस्का, पिसेवडधा आदी गावासह खेडेगावात आपले एजन्ट नेमले आहे. सायंकाळ झाली की नेमलेले हे एजन्ट लोकांकडून सट्ट्याचे नंबर घेऊन रात्री उशिरापर्यंत भ्रमणध्वनीद्वारा आपल्या मुख्य एजन्टला सट्ट्याचे नंबर कळवितात. शनिवारी व रविवारी सट्टापट्टी एजन्टचा हजारो रूपयांचा व्यवसाय होतो. या दोन्ही दिवशी सुट्टी राहत असल्याने सट्ट्याचे आकडे लावणाºयाचे प्रमाण अधिक असते. विकासापासून कोसो दूर असलेल्या भागात आर्थिक मिळकतीचे कोणतेही साधन नाही. शेती व्यवसाय व शासकीय कामातून झालेली आर्थिक मिळकत या सट्टा व्यावसायिकांच्या घशात जाते, अशी प्रतिक्रिया एका वयोवृद्ध नागरिकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
सट्ट्याचे नंबर घेणारे हे लोक गावातील पानठेला, किराणा दुकान तसेच चौकातील मुख्य जागेवर सट्ट्याचे नंबर घेत असतात. पुरूष मंडळी दिवसभर सट्ट्याचे नंबर लावण्यास गुंतलेले असतात. सट्टापट्टी घेणारे एजन्ट घरापर्यंत पोहोचून महिला व विद्यार्थ्यांकडून नंबर घेतात. गावाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी सदर परिसरात तंटामुक्त समितीमार्फत दारूबंदी करण्यात आली. मात्र दुसरीकडे सट्टा जुगारामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
तंटामुक्त समित्या बसल्या गप्प
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री, सट्टापट्टी जुगार व इतर अवैध धंदे सुरू आहेत. गावातील हे अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी तंटामुक्त समितीच्या पदाधिकारी, सदस्यांसह गावातील सरपंच, पोलीस पाटील यांची आहे. मात्र हे सारे प्रतिनिधी अवैध धंद्याबाबत एक शब्दही काढताना दिसून येत नाही. त्यामुळे गावातील अवैध धंद्याला या साºया लोकांची मुकसंमती आहे, असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. स्वत:च्या गावाचा कारभार कसा सुरळीत चालावा, यासाठी तंमुस पदाधिकारी, ग्रा.पं. पदाधिकारी, पोलीस पाटील प्रयत्न करू शकतात. मात्र या सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारूविक्री व सट्टा जुगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहे.